साधकांवर मातृवत प्रेम करणार्‍या आणि तळमळीने सेवा करून श्रीगुरूंचे मन जिंकणार्‍या पू. (कु.) दीपाली मतकर (वय ३३ वर्षे) सनातनच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान !

‘एरव्ही गुरु शिष्यांना आनंद देतात. २८ ऑक्टोबर या दिवशी (कु.) दीपाली मतकर यांनी संतपदावर आरूढ होऊन मला शब्दातीत आनंद दिला !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.१०.२०२१)
पू. (कु.) दीपाली मतकर

२८ ऑक्टोबर या दिवशी पू. (कु.) दीपाली मतकर या सनातन संस्थेच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्याचे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सोलापूर येथे झालेल्या एका सोहळ्यात घोषित केले. पू. (कु.) दीपाली मतकर यांनी विविध सेवा दायित्व घेऊन केल्या. त्यांनी साधकांवर मातेसमान प्रेम करून त्यांना साधनेत पुढे जाण्यासाठी साहाय्य केले.

पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या ‘संत सन्मान’ सोहळ्यातील वैशिष्ट्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/523189.html
पू. (कु.) दीपाली मतकर यांचा सन्मान करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये