सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या अनुभूती

वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ब्रह्मोत्सव स्वरूपात साजरा केला होता. त्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !

‘काही जिल्ह्यांतून रामनाथी आश्रमात आलेल्या अध्यात्मप्रसाराची सेवा करणार्‍या काही साधकांशी २९.९.२०२३ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी अनौपचारिक संवाद साधला. त्या वेळी साधकांनी त्यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांनी साधकांना दिलेली उत्तरे येथे दिली आहेत.

सिंधुदुर्ग : प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त सावंतवाडी येथे विष्णुयाग

सावंतवाडी येथील संत प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यास ३० एप्रिल या दिवशी प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी यांचा दुटप्पीपणा जाणा !

‘विज्ञानाने सिगारेट, दारू इत्यादींचे दुष्परिणाम सिद्ध केलेले असूनही धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी त्यांसंदर्भात मोहीम उघडत नाहीत. मटका, जुगार यांसंदर्भातही मोहीम न उघडता केवळ हिंदु धर्माविरुद्ध मोहीम उघडून स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवतात, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेची तीव्र तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे नांदेड (महाराष्ट्र) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शांताराम बेदरकर (वय ४३ वर्षे) !

शांतारामदादांचे व्यावहारिक दृष्ट्या शिक्षण अल्प झाले आहे. तरीही केवळ त्यांच्यातील भाव आणि तळमळ यांमुळे ते सांगत असलेला विषय सर्वांना आकलन होतो अन् ऐकणार्‍याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करावीशी वाटते. 

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केल्यामुळे मनातील पूर्वग्रहावर मात करून सासर्‍यांची भावपूर्ण सेवा करणार्‍या कोथरूड, पुणे येथील सौ. संगीता संजय लेंभे !

परम पूज्यांनी सांगितल्याप्रमाणे ‘देवाण-घेवाण हिशोब संपवणे’, हे अतिशय महत्त्वाचे आहे’, या विचाराने मी माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेले किल्मिष आणि पूर्वग्रह काढू शकले अन् ‘मनापासून त्यांची सेवा करायची’, असे ठरवून सेवा करायला आरंभ केला. 

अनंत कोटी ब्रह्मांड सांभाळणार्‍या देवाप्रमाणे साधकांनीही समष्टी साधना म्हणून आश्रमातील सेवा किंवा संस्थेचे कार्य अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करायला हवा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन …

सनातनचे ३२ वे (व्यष्टी) संत पू. सौरभ जोशी (वय २८ वर्षे) यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा उच्च कोटीचा भाव !

चैत्र कृष्ण अष्टमी (१.५.२०२४) या दिवशी पू. सौरभ जोशी यांचा २८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे वडील श्री. संजय जोशी यांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी एकामागून एक येणार्‍या निरनिराळ्या विषयांवर संबंधित साधकांना अचूक मार्गदर्शन करणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मार्गदर्शन करतांना सांगतात, ‘एकदा अध्यात्माचे ज्ञान झाले की, जगातील सर्व विषयांचे ज्ञान होते. प्रत्येक विषयाचा वेगळा अभ्यास करावा लागत नाही.

क्रूरतेचा इतिहास नसलेला जगातील एकमेव हिंदु धर्म !

. . . हिंदु धर्म सोडून इतर धर्मांचा (पंथांचा) इतिहास पाहिला, तर त्यात विविध काळांत केलेल्या लाखो हत्यांच्या, क्रूरतेच्या, बलात्कारांच्या, जिंकलेल्या प्रदेशातील स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून विकण्याच्या सहस्रो नोंदी आहेत. फक्त अनादि काळापासून अस्तित्वात असलेल्या हिंदु धर्माच्या इतिहासात असे एकही उदाहरण नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले