धर्माचरण करणारी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारी लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील कु. सोनाली शेट्ये !

चैत्र कृष्ण एकादशी, ४.५.२०२४ या दिवशी कु. सोनाली शेट्ये (वय १९ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

हिंदूंच्या सद्य:स्थितीचा आध्यात्मिक स्तरावर विचार करा !

‘मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर विचार करणार्‍यांना काळजी वाटते, ‘पुढे हिंदु अल्पसंख्यांक होणार.’ याउलट आध्यात्मिक स्तरावर विचार करणार्‍यांना कळते की, कालचक्रानुसार पुढे हिंदु धर्म असणार आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्रीकृष्णाचे चित्र, प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

‘प.पू. भक्तराज महाराज’ यांचे छायाचित्र जागृत झाले आहे व त्यांच्या हातातील काठी आणि त्यांचे डोळे अन् मस्तक यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवले.

चेन्नई येथील श्री गुरुवायुरप्पन् यांच्या मंदिरात दर्शन घेत असतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवही आपल्याशी केवळ संभाषण करत नाहीत, तर ते आपल्या स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्वरूपांतील शंकांचे निरसनही करतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या अनुभूती

वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ब्रह्मोत्सव स्वरूपात साजरा केला होता. त्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या काही अनुभूती आपण २ मे या दिवशी पाहिल्या. आज पुढील अनुभूती पाहूया.

शिबिरासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर सौ. मंगला पांडे यांना आलेल्या अनुभूती

नामजप करतांना मला गुरुमाऊलीचे विशाल चरण दिसून सगळीकडे चैतन्य जाणवू लागले आणि नंतर मला माझे शरीर हलके जाणवू लागले. मन निर्विचार होऊन माझा नामजप एकाग्रतेने होऊ लागला.

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, मानवाला मानवदेहधारी प्राणी बनवू नका !

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्यवाले थयथयाट करतात. ते विसरतात की, प्राणी आणि मानव यांच्यात महत्त्वाचा भेद म्हणजे प्राणी व्यक्तीस्वातंत्र्यानुसार, म्हणजे स्वेच्छेने वागतात. याउलट मानवाने . . . असे वागला, तरच तो खर्‍या अर्थाने मानव असतो, नाहीतर तो केवळ मानवदेहधारी प्राणी असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना त्यांचे वडील पू. सत्यनारायण तिवारी यांची सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

माझ्या मनात प्रार्थना आणि सेवा यांचे विचार असतील किंवा मी नामजप करत असेन, तेव्हा पू. बाबा माझ्याकडे अधूनमधून शांतपणे पहायचे. त्या वेळी ‘संतांच्या सहवासात आपले सतत परीक्षण होत असते’, असे मला वाटले. 

स्वतःच्या मनाच्या स्थितीच्या संदर्भात साधिकेला जाणवलेली सूत्रे

‘देवाचे अस्तित्व सतत अंतर्मनात आहे’, असे मला जाणवते. प्रसंग घडतात; पण त्याविषयीचे विचार माझ्या बाह्यमनाला स्पर्श करून निघून जातात. ते माझ्या अंतर्मनापर्यंत जात नाहीत.

वर्ष २०२२ मधील ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’निमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ध्वजारोहणाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘सूर्यदेवाचा अस्त होत असतांना त्याचे पूर्व दिशेला दर्शन होत आहे. आता लवकरच रामराज्य येणार आहे’, असे मला जाणवले.