सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या अनुभूती

वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ब्रह्मोत्सव स्वरूपात साजरा केला होता. त्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सौ. कंचन शर्मा

१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी दीड घंटा मनापासून आणि बसून नामजप होणे : ‘११.५.२०२३ या दिवशी प.पू. गुरुदेवांचा ८१ वा जन्मोत्सव सोहळा पहायला मिळणार’, असे कळल्यावर मला कृतज्ञता वाटली. अलीकडे माझे त्रास वाढले होते. माझा एका ठिकाणी बसून नामजप होत नव्हता. कितीही प्रयत्न केले, तरी अनेक अडचणी येत होत्या; पण जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी ९० मिनिटे (दीड घंटा) बसून आणि मनापासून नामजप झाला.

१ आ. रथारूढ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या दर्शनाने आध्यात्मिक त्रासामुळे आलेली निराशा जाणे : रथारूढ परात्पर गुरु, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे पहातांना मला ‘मी चित्रच पहात आहे’, असे वाटले. साधक त्यांचा रथ ओढतांना ‘मीही त्यांच्या समवेत रथ ओढत आहे’, असे मला वाटले. तेव्हा माझा देह हलका होऊन मला भावाश्रू आले. प्रतिदिन होणार्‍या आध्यात्मिक त्रासामुळे मला निराशा आली होती; परंतु पूर्ण सोहळा होईपर्यंत आणि दुसर्‍या दिवशीही मला आनंदी जाणवून स्थिर रहाता आले.

१ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्व साधकांना भावपूर्ण नमस्कार करतांना पाहून ते ‘कृष्ण’ (गोपाल) आहेत’, असे वाटणे : ‘परात्पर गुरुदेव साधकांमध्ये प.पू. भक्तराज महाराज यांचे रूप पाहून त्यांना हात जोडून नमस्कार करत असल्यामुळे त्यांचा भाव जागृत झाला आहे’, असे मला वाटले. त्यांचे रूप बघून ते ‘कृष्ण’ (गोपाल) आहेत’, असे मला जाणवले.

१ ई. जन्मोत्सवाचा आनंद अनुभवता येण्यासाठी प्रार्थना केल्यावर सतत ३ दिवस चैतन्य जाणवणे : परम पूज्यांचा जन्मोत्सव सोहळा बघतांना मला नेहमीच आध्यात्मिक त्रास अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे मी सोहळ्याचा पूर्ण आनंद अनुभवू शकत नाही; म्हणून या वेळी मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘गुरुदेवा, मला तुमच्या या जन्मोत्सवाचा आनंद घ्यायचा आहे.’ पुष्कळ ऊन असूनही मी आनंदाने सोहळ्याला गेले. रिक्शा मिळत नसल्याने मला वाटले, ‘मी वेळेत पोचणार नाही’; परंतु मला लगेच रिक्शा मिळाली. रिक्क्षा चालकाने आम्हाला अल्प पैशांत ब्रह्मोत्सवस्थळी पोचवले. ब्रह्मोत्सवानंतर मला वातावरणांत ३ दिवस सतत चैतन्य जाणवत होते.

१ उ. ब्रह्मोत्सवानंतर स्वतःमध्ये जाणवलेले पालट !

१. ब्रह्मोत्सव सोहळा पाहिल्यापासून मला गाढ झोप लागते.

२. थकवा न जाणवता माझ्या मनाला उत्साह वाटत आहे आणि कामाचाही ताण येत नाही.

३. मला माझ्यामधील स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव होत आहे.

४. इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांना स्वीकारता येत आहे.

५. मला सर्वांप्रती प्रेम वाटत आहे.

६. मी कुठल्यातरी बंधनात अडकले होते. आता मला मोकळा श्वास घेता येत आहे.

‘गुरुदेवा, आपल्या कृपेमुळेच या वेळी मला स्वतःचे अस्तित्व जाणवून आनंद अनुभवता आला’, यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’

२. सौ. अरुणा प्र. बिंड

२ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा आहे’, असे कळल्यावर नामजप करतांना आलेल्या अनुभूती

२ अ १. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सिंहासनारूढ दिसून त्यांच्यावर देवता पुष्पवृष्टी करतांना दिसणे : ‘५.४.२०२३ या दिवशी नामजप करतांना मला पुढील दृश्य दिसले, ‘प.पू. गुरुदेव, माता श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि माता श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ हे तिन्ही गुरु भव्य-दिव्य सिंहासनावर बसले असून ते साधकांना चैतन्य देऊन त्यांच्याकडे वात्सल्याने बघत आहेत. सर्व देवता या तिन्ही गुरूंवर आकाशातून पुष्पवृष्टी करत आहेत. सर्व साधक हे दृश्य भावविभोर होऊन बघत आहेत.’

२ आ. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी आलेल्या अनुभूती

१. सकाळी उठल्यापासून ‘चैतन्य’, ‘चैतन्य’, असा नामजप दिवसभर चालू होता.

२. अकस्मात् कार्यक्रमाच्या खोलीत एक सेकंद पांढरा प्रकाश दिसला.

३. रथारूढ प.पू. गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यासमोर साधिका नृत्यसेवा करत होत्या. ते पहातांना ‘स्वर्गातील अप्सरा या तिन्ही गुरूंच्या समोर नृत्यसेवा करत आहेत’, असे मला जाणवले.

मला आलेल्या या अनुभूतींसाठी तिन्ही गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ (क्रमश:)

(सर्व सूत्रांचा दिनांक १३.५.२०२३)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

याच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  https://sanatanprabhat.org/marathi/790112.html