सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन
श्री. प्रशांत कोयंडे : आश्रम पहातांना तेथे काही छोट्या छोट्या चुका लक्षात आल्या किंवा सूत्रे लक्षात आली, तर तोच अधिक विचार असतो. मी स्वतःचा विचार करण्यापेक्षा तो विचार अधिक करतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : चुका लक्षात आल्यावर त्या कुणाला तरी सांगता ना ?
श्री. प्रशांत कोयंडे : हो. संबंधित दायित्व असणार्या साधकाला सांगतो. माझ्या मनात ‘तुम्ही जे आम्हाला शिकवले आहे, ते पुढच्या पिढीला सांगायला हवे’, असे विचार अधिक असतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो. हे महत्त्वाचे आहे; कारण ही समष्टी साधना आहे. व्यष्टी साधनेमध्ये साधक केवळ स्वतःचा विचार करतो. देव अनंत कोटी ब्रह्मांडाचा विचार करतो ना ? आपणही व्यापक विचार केला पाहिजे. छान !