१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चरण दिसून एकाग्रतेने नामजप होणे
नामजप करतांना मला गुरुमाऊलीचे विशाल चरण दिसून सगळीकडे चैतन्य जाणवू लागले. नंतर मला माझे शरीर हलके जाणवू लागले. मन निर्विचार होऊन माझा नामजप एकाग्रतेने होऊ लागला.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर पाय दुखायचा थांबणे
आश्रमात जिन्याच्या पायर्या उतरतांना माझे पाय दुखू लागले. मला लगेच गुरुमाऊलीचे स्मरण झाले आणि त्यांना प्रार्थना झाली, ‘तुम्हीच बघा, मला अजून २ दिवस शिबिराला उपस्थित रहायचे आहे.’ त्यानंतर गुरुमाऊलींच्या कृपेने माझे पाय दुखले नाहीत. त्यामुळे मला शिबिरात उत्साहाने उपस्थित रहाता आले.
या अनुभूती दिल्यासाठी गुरुचरणी पुष्कळ कृतज्ञता !’
– सौ. मंगला पांडे, अकोला (वय ६० वर्षे) (२९.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |