चैत्र कृष्ण एकादशी, ४.५.२०२४ या दिवशी कु. सोनाली शेट्ये (वय १९ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. सोनाली शेट्ये हिला १९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. कुटुंबियांना साहाय्य करणे
‘सोनाली कुटुंबियांना घरकाम आणि सेवा यांमध्ये साहाय्य करते.
२. इतरांना चुकीची जाणीव करून देणे
अ. ‘कु. सोनाली तिच्या आजूबाजूच्या व्यक्ती किंवा तिच्या मैत्रिणी यांच्याकडून अपशब्द ऐकते. तेव्हा ती त्यांना सांगते, ‘आपण अपशब्द वापरणे योग्य नाही. त्यात आपली हानी होऊन पाप लागते.’
आ. तिच्या वर्गातील मैत्रिणी महाविद्यालयात गेल्यावर वर्गात न बसता बाहेर फिरत असतात. तेव्हा तिने तिच्या मैत्रिणींना सांगितले, ‘‘आपण वर्गात न बसता बाहेर फिरणे योग्य नाही.’’
३. सेवेची तळमळ
सोनाली सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. ती सुटीच्या दिवसात रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्यासाठी जाते. तसेच ती सत्संगाला उपस्थित असते. ती समष्टी सेवा करण्यासाठी तत्पर असते.
४. धर्माचरण करणे
अ. ती स्वतः कुंकू लावते आणि त्याविषयी तिच्या मैत्रिणींनाही कुंकू लावायला सांगते.
आ. ती हलाल प्रमाणित वस्तू वापरत नाही आणि तसे इतरांनाही स्वदेशी वस्तू वापरण्यास सांगते.
इ. तिने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले आहे.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
अ. कु. सोनाली घरात असतांना ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आहे’, असा भाव ठेवते. ती परम पूज्य गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) ‘माझी व्यष्टी साधना चांगली होऊदे’, अशी प्रार्थना करते. परम पूज्य गुरुदेव तिला स्वप्नात दिसतात.
आ. एखाद्या संघर्षमय प्रसंगात ती परम पूज्य गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहून त्यांना प्रार्थना करते. तेव्हा तिची भावजागृती होते.
इ. ती गुरुदेवांमध्ये श्रीकृष्णाचे रूप पहाण्याचा प्रयत्न करते.
– सौ. शालन जयेश शेट्ये (कु. सोनालीची आई), ता. लांजा, जि. रत्नागिरी. (१५.१.२०२४)
कु. सोनाली जयेश शेट्ये हिला आलेल्या अनुभूती
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना केलेल्या प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचणे
‘मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्यासाठी गेले होते. तेव्हा मी परम पूज्य गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले) केलेल्या प्रार्थनेप्रमाणे घडत होते, उदा. मी परम पूज्य गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘गुरुदेव आज मला स्वयंपाकघरात सेवा करायची आहे.’ तेव्हा दायित्व असणार्या साधिकेकडून निरोप आला, ‘आज २ घंटे तुला स्वयंपाकघरात सेवा करायची आहे.’ यावरून ‘गुरुदेव आपली काळजी घेतात आणि गुरुदेवांची आपल्यावर कृपा आहे’, हे लक्षात येते.
२. श्री जगन्नाथांच्या मूर्तीकडे बघून भावजागृती होणे
मी एके दिवशी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसले होते. तेथील श्री जगन्नाथांच्या मूर्तीकडे बघून माझी पुष्कळ भावजागृती होत होती. ‘श्री जगन्नाथ माझ्याशी बोलत आहे’, असे मला वाटत होते.
३. मारुतिरायाने प्रभु श्रीरामाची दास्यभक्ती केली, तशीच गुरुदेवांची दास्यभक्ती होण्यासाठी प्रार्थना करणे
एकदा रामनाथी आश्रमातील भावसत्संगात मारुतिरायाच्या दास्यभक्तीविषयी सांगत होते. ‘मारुतिरायाने जशी श्रीरामाची दास्यभक्ती केली, तशीच साधकांनी गुरुदेवांची दास्यभक्ती करायला हवी’, असे सांगितले होते. संध्याकाळी मी ध्यानमंदिरातील पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीकडे पहात होते. तेव्हा मी मारुतिरायाकडे प्रार्थना केली, ‘तुम्ही जशी प्रभु श्रीरामाची दास्यभक्ती केली, तशीच दास्यभक्ती मला माझ्या गुरुदेवांची करता येऊ दे.’ त्यानंतर माझी भावजागृती झाली.
‘परम पूज्य गुरुदेवांनी मला या अनुभूती दिल्या आणि त्यांनी माझ्यावर कृपेचा वर्षाव केला’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. सोनाली जयेश शेट्ये, ता. लांजा, जि. रत्नागिरी, (१५.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |