पुणे – कोरोना महामारीच्या काळात ओळख वाढवून महिला पोलीस कर्मचार्याला गुंगीचे औषध देऊन पोलीस कर्मचारी दीपक मोघे याने बलात्कार केला. त्याचे चलचित्रीकरण करून ते सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत पुन्हा पुन्हा बळजोरी केली, तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात पीडितेने तक्रार प्रविष्ट केली आहे. घरातील ६ तोळे सोने, भ्रमणसंगणक, भ्रमणभाष अशा वस्तूही आरोपीने बळजोरीने घेऊन गेल्याची माहिती तक्रारीमध्ये नमूद करण्यात आली आहे. सध्या मार्केटयार्ड पोेलीस ठाण्यात कार्यरत असणार्या दीपक मोघे या पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार वर्ष २०२० ते १ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घडला आहे. तक्रारदार आणि आरोपी हे दोघेही पुणे शहर पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत.
संपादकीय भूमिकापोलीस विभागात महिला पोलीस असुरक्षित असणे दुर्दैवी आणि संतापजनक ! असा पोलीस विभाग सामान्य महिलांसाठी कधीतरी आधार वाटणारा ठरेल का ? वरिष्ठ पोलिसांनी याची गांभीर्याने नोंद घेऊन संबंधितांना कठोर शिक्षा देणे आवश्यक ! |
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
अखेर तुळजाभवानी देवीचा मुकुट सापडला; दोन जण जेरबंद