प्रपंचापेक्षा परमार्थ सोपा !
परमार्थ प्रपंचापेक्षा सोपा आहे. प्रपंचात सर्वांची मनधरणी करावी लागते. प्रपंचात सर्वांना द्यावे लागते. भगवंताला काही न देता होते. नुसता प्रपंच, म्हणजे विधीयुक्त कर्ममार्ग, नीतीचे आचरण वगैरे. प्रपंचाला भगवंताचे अधिष्ठान नसेल, तर खरी गोडी नाही.