स्वतःच्या खर्‍या स्वरूपासंबंधीचे अज्ञान हेच आपल्या भयाचे कारण !

४ जुलै : आज स्वामी विवेकानंद यांचे पुण्यस्मरण (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…

स्वामी विवेकानंद

भय हेच अधःपतनाचे आणि पापाचे निश्चित कारण आहे. भयामुळेच दुःख प्राप्त होते, भयामुळेच मृत्यू ओढवतो. भयामुळेच सार्‍या वाईट गोष्टी उत्पन्न होतात आणि या भयाचे कारण कोणते आहे ? स्वतःच्या खर्‍या स्वरूपासंबंधीचे अज्ञान, हेच आपल्या भयाचे कारण होय. आपल्यापैकी प्रत्येक जण त्या राजाधिराज परमेश्वराचा वारसदार आहे.

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)