बलाचा नेहमी विचार करणे हाच उपाय !

स्वामी विवेकानंद यांची शिकवण

स्वामी विवेकानंद

उठा, धीट बना, शक्तीसंपन्न बना ! तुम्ही सगळे दायित्व स्वतःच्या शिरावर घ्या आणि जाणून असा की, तुम्हीच आपल्या भाग्याचे निर्माते आहात. तुम्हाला हवे असलेले सर्व साहाय्य आणि सर्व बल तुमच्यामध्येच आहे; म्हणून तुम्हीच स्वतःचे भवितव्य घडवा.

सर्वदा दुर्बलतेचा विचार केल्याने बल प्राप्त होत नाही. दुर्बलतेचेच सतत चिंतन करत बसणे, हा दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही. बलाचा नेहमी विचार करणे, हाच उपाय आहे.

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)