प्रपंचापेक्षा परमार्थ सोपा !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

परमार्थ प्रपंचापेक्षा सोपा आहे. प्रपंचात सर्वांची मनधरणी करावी लागते. प्रपंचात सर्वांना द्यावे लागते. भगवंताला काही न देता होते. नुसता प्रपंच, म्हणजे विधीयुक्त कर्ममार्ग, नीतीचे आचरण वगैरे. प्रपंचाला भगवंताचे अधिष्ठान नसेल, तर खरी गोडी नाही. प्रपंचात अडचणी येतील; पण त्यामुळे आपले बिघडू देऊ नये. नामाचे प्रेम राखावे. देहाला कष्ट दिले, म्हणजे भगवंत वश होतो, हे काही खरे नाही. तसे जर असते, तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणार्‍यांना भगवंत लवकर वश झाला असता !

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)