१० माणसांना त्यांच्या असमाधानाचे कारण आपण विचारले, तर ती माणसे १० निरनिराळी कारणे सांगतील. यावरून असे दिसते की, जगातील कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही. समाधान प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडे आहे त्याच्यापासून ते ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत, प्रत्येकाला काही तरी उणे-अधिक असणारच. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे आणि ती मिळवण्याचा उपाय, म्हणजे भगवंताचे स्मरण होय. प्रत्येकाला आवश्यक एवढे भगवंत देत असल्याने आहे त्यात समाधान मानावे.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज (साभार : फेसबुक)