घरातून बाहेर पडतांना आणि घरी परत आल्यावर देवाला नमस्कार करण्याचे महत्त्व !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

घरातून बाहेर पडतांना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही त्याचे दर्शन घ्या; कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पहात असतो. आपल्या घरी असा नियम बनवा की, जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता, तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून ‘हे परमेश्वरा, तुम्हीही माझ्यासोबत चला’, असे म्हणा; कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाख रुपयांचे घड्याळ असेल; परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्याच हातात आहे.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)