‘मायेची माया, म्हणजे वस्तूतः सर्वव्यापक प्रेम; परंतु मायेतून अकस्मात् मायावीपणा निर्माण होतो आणि सर्वनाश ओढवतो. सद्गुरु मायिकतेचा आकडा आपल्या शिष्याच्या अंतःकरणातूनच काढून टाकतात. यासाठी सद्गुरूंचे प्रमुख कार्य, म्हणजे शिष्याच्या ठिकाणी शांती आणि समाधान यांची स्थापना करणे, हे असते. त्यामुळे बहिर्मुखी वृत्तीला आतूनच आळा बसतो. शांती आणि समाधान यांच्या झारीतून बाहेर पडलेली वासना विकाराने प्रबळ असूच शकत नाही. मग उरते ती साधी इच्छा. त्यात मायिकता नसते. उरलेली माया बाधक तर नाहीच, उलट साह्यभूत होत रहाते.’
– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)