पुणे येथे ‘विश्वमाता गौमाता’ नृत्य नाटिकेचे आयोजन !

‘विश्वमाता गौमाता’ या नृत्य नाटिकेचे आयोजन

पुणे – श्री शक्तीदर्शन योगाश्रम, किन्नीगोळी आणि सुरभिवन गौशाळा – ओम प्रकृती धामा ट्रस्ट, कोंपंडावू यांच्या वतीने ‘विश्वमाता गौमाता’ या नृत्य नाटिकेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘गोमातांच्या उत्पत्तीचे, कथेचे आणि गोमातेची हत्या अन् भक्षण केल्याने होणारे दुष्परिणाम’ याचे चित्रण या नृत्य नाटिकेत करण्यात आले आहे. ‘देशी भारतीय गायीं’च्या लुप्त होत चाललेल्या जातीला वाचवण्याचा आणि संपूर्ण भारतभर गोमातेचे संरक्षण सुनिश्चित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.

३ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. कार्यक्रमाला योग अभ्यासक आचार्य केदारनाथ उपस्थित रहाणार आहेत. पूज्य गुरुजी देवदास राव (पू. देवबाबा) यांच्या पुढाकाराने श्री शक्तीदर्शन योगाश्रम आणि सुरभिवन गौशाळा स्थापन झाल्या आहेत. या कार्यक्रमाच्या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. देवबाबा यांचा सन्मान करण्यात येणार आहे.