महड (रायगड) येथे मुसलमानाने गाभण गाय गोठ्यातून चोरून नेऊन कापली !

पोलिसांकडून धर्मांधाला अटक करून गोठा उद्ध्वस्त !

वातावरण न तापवण्याचे पोलिसांचे ग्रामस्थांना आवाहन

रायगड – येथील खालापूर जिल्ह्यातील महड येथे धर्मांधाने हिंदु कुटुंबियांच्या गोठ्यात बांधलेली गाय चोरून तिचा गळा कापून तिला ठार मारले. गायीसमवेत एका वासराचाही गळा कापून धर्मांधाने त्याला ठार मारले. ‘हे वासरू मात्र कुठून आणले ?’, याचा अद्याप शोध लागलेला नाही. या प्रकरणी पोलिसांनी शाहनबाज हुसेन अब्दुल लतिफ बेडेकर याला अटक केली आहे, तसेच त्याने जेथे गाय आणि वासरू यांना कापले, तो गोठा पोलिसांनी ३ मे या दिवशी जे.सी.बी.च्या साहाय्याने उद्ध्वस्त केला आहे. शाहनबाज याने कापलेली गाय गाभण असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

१. महड येथे रहाणारे शेतकरी तुषार पाटील यांनी त्यांच्या गोठ्यात गायीला बांधले होते. २ मे या दिवशी सकाळी ते गोठ्यात गेले असता दावणीला गाय नसल्याचे त्यांना आढळून आले. शोध घेऊनही गाय सापडली नाही.

२. ३ मे या दिवशी गायीचा शोध घेत असतांना शाहनबाज याच्या घराजवळ एका खोलीच्या बाहेर चारा ठेवण्यात आल्याचे त्यांना दिसून आले. संशय येऊन त्यांनी खोलीत पाहिले, तर तेथे गाय आणि वासरू तेथे मृतावस्थेत आढळले. त्यांची मान कापून पोट फाडण्यात आले होते.

३. हा प्रकार आजूबाजूच्या ग्रामस्थांना सांगून त्यांनी त्वरित खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. तुषार पाटील यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शाहनबाज याचा शोध घेऊन त्याला अटक केली. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

वातावरण न तापवण्याचे पोलिसांचे ग्रामस्थांना आवाहन

पोलीस असे आवाहन कधी मुसलमानांना करतात का ? हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस मुसलमानांसमोर नांगी टाकतात, हेच खरे !
या वेळी पोलिसांनी ग्रामस्थांना ‘वातावरण तापवू नका’, असे आवाहन केले. यावर उपस्थित ग्रामस्थांनी ‘आम्ही शांतच आहोत. आम्ही संयम पाळतो; म्हणून असे प्रकार वाढत आहेत. हा आमच्या भावनांचा प्रश्‍न आहे. तक्रार करून हिंदू थकून जातात. कायद्याची भीती राहिलेली नाही. अशी कारवाई करावी की, अशा प्रकारचे धारिष्ट्य पुन्हा कुणी करू नये’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

संपादकीय भूमिका

  • वातावरण न तापवण्याचे आवाहन पोलीस  कधी मुसलमानांना करतात का ? हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस मुसलमानांसमोर नांगी टाकतात, हेच खरे !
  • हिंदूंच्या गोठ्यातून गायीला चोरून कापण्याइतपत धाडस करणार्‍या मुसलमानांना कायद्याचे भयच राहिलेले नाही, हेच यावरून दिसून येते. अशांवर वचक निर्माण करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?