गोव्यात कह्यात घेतलेले २५ किलो अमली पदार्थ आज नष्ट केले जाणार

संपूर्ण देशभरात आज नष्ट करण्यात येणार्‍या अमली पदार्थांची संख्या पकडल्यास १ जून २०२२ पासून आतापर्यंत अमली पदार्थ नष्ट केल्याची संख्या १० लाख किलोवर (किंमत सुमारे १२ सहस्र कोटी रुपये) पोचणार आहे !

कुंकळ्ळी (गोवा) येथे पोर्तुगिजांविरुद्ध लढा दिलेल्या १६ महानायकांना मानवंदना !

श्री शांतादुर्गा सेवा समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्मारकावर जलाभिषेक करून महानायकांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘हिंदु अस्मितेचा आविष्कार’ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

गोव्यात पुन्हा वीज दरवाढ होणार !

सरासरी दरवाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. आता ही दुसरी वीज दरवाढ होणार आहे. वीजदेयके २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ही योजना तात्काळ लागू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख !

कणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख आणि औरंगजेबाचे रेखाचित्र छापण्यात आले आहे. यामुळे राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे.

केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते एकात्मिक आयुष उपचारपद्धती सेवांचे गोव्यात उद्घाटन

एकात्मिक आयुष उपचारपद्धती सेवा पुरवणारे गोवा हे देशातील पहिले केंद्र ! भारताने जगाला सर्वोत्तम उपचारपद्धती दिल्या. त्यामुळे जगात आयुषची विश्वासार्हता वाढली आहे. गोव्यात या उपचारपद्धतींचा स्थानिकांबरोबरच पर्यटकांनाही लाभ होईल.

गोवा सरकारने म्हादई अभयारण व्याघ्र क्षेत्र घोषित करावे ! – ‘म्हादई बचाव अभियान’

गोवा सरकारने म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित केल्यास म्हादई जलवाटप तंटा प्रकरणी न्यायालयात कर्नाटकच्या विरोधात आपली बाजू भक्कम झाली असती. या एकाच निर्णयाने म्हादई जलवाटप तंटासंबंधीचा प्रश्न पूर्णपणे निकालात निघाला असता !

पुणे येथील अष्टांग योगी संत श्री शिवोकांत स्वामीजी यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

या वेळी स्वामीजी म्हणाले, ‘‘हिंदु धर्मासाठी संघटित होऊन लढा द्यायला हवा. अहंकारी राज्यकर्त्यांनी सत्तेच्या स्वार्थापोटी हिंदु धर्माची अनन्वित हानी केली आहे. सात्त्विक लोकांना धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी संघर्ष करावा लागतो.’’

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाला वेग

मुंबई – गोवा महामार्गाची पहाणी करत असतांना कशेडी घाटातील दोनपैकी १ बोगदा कोणत्याही परिस्थितीत गणेशभक्तांसाठी गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या.

गोवा : पुरातत्व कार्यालयात कागदपत्रे असलेल्या खोलीत प्रवेशासाठी सर्वसामान्य नागरिकांना कडक निर्बंध लागू

‘बैल गेला अन् खोपा केला’, ही म्हण सार्थ ठरवणारे पुरातत्व खाते !

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या व्याघ्र प्रकल्प निकषात गोवा बसत नाही ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

‘‘आधीच सत्तरी तालुक्यातील लोकांना विविध कारणांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या जीवनाशी खेळून कुठलीच गोष्ट करता येणार नाही. व्याघ्र प्रकल्प करणे गोव्याला परवडणारे नाही.’’