६ वर्षांत गोव्यातील ४५ सहस्र लोक दारिद्र्यरेषेबाहेर !

नीती आयोगाने नुकताच ‘राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक : प्रगतीसंबंधी समीक्षा २०२३’ या नावाने अहवाल प्रसिद्ध केला आहे. नीती आयोगाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

गोवा : ‘बालरथ’ कर्मचार्‍यांना समाधानकारक वेतनवाढ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

‘बालरथ’ (लहान मुलांना शाळेत ने-आण करणारी छोटी बस) चालक आणि वाहक यांनी १७ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचे पडसाद १८ जुलै या दिवशी विधानसभेत उमटले.

गोवा : आज प्रारंभ होणार्‍या चौथ्या ऊर्जा संक्रमण कार्यकारी गटाच्या बैठकीत ६ प्राधान्ये

या चौथ्या बैठकीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्रीस्तरीय निवेदनाच्या मसुद्यावर होणारी सविस्तर चर्चा ही आहे. बैठकीला जोडूनच विविध अन्य कार्यक्रमांचे (साइड इव्हेंट्सचे) आयोजन करण्यात आले आहे.

गोवा : कला अकादमीतील रंगमंचाचे छत कोसळल्यावरून गोवा विधानसभेत गदारोळ !

कला अकादमीच्या खुल्या प्रेक्षागृहाच्या रंगमंचाचे छत कोसळल्याच्या प्रकरणाचे पडसाद गोवा विधानसभेच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजावर उमटले !

गोवा : सदानंद शेट तानावडे राज्यसभेचे खासदार घोषित

आज औपचारिकरित्या त्यांचे खासदारपद घोषित करण्यात आले. राज्यसभेसाठी भाजपचे विधानसभेत बहुमत होते. हे लक्षात घेऊन विरोधी पक्षांनी त्यांचा उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड निश्‍चित झाली होती.

गोवा : मेरशी येथील टोळीयुद्धात एका प्रशिक्षणार्थी पोलिसाचा सहभाग

प्रशिक्षण घेतेवेळीच गुंडांशी संबंध असलेला प्रशिक्षणार्थी पोलीस सेवेत रूजू झाल्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखू शकेल का ?

गोवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळा !

इयत्ता ७ वीच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळावा, ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रहित करावा, या मागण्या म्हापसा येथे संपन्न झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या माध्यमातून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केल्या.

गोवा येथील कला अकादमीच्या खुल्या प्रेक्षागृहाच्या रंगमंचाचे छत कोसळले : नागरिकांमध्ये संताप

निविदा न काढता नूतनीकरणाचे काम हाती घेतल्याने हे काम प्रारंभापासूनच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. व्यासपिठावरील अनेक पुरातन आणि दर्जेदार प्राचीन साहित्याची मोठी हानी झाली आहे.

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात २ सहस्र ३८७ प्रश्न आणि ८ सरकारी विधेयके

अधिवेशनात आणखी काही सरकारी विधेयके, खासगी विधेयके आणि लक्षवेधी ठराव मांडले जाण्याची शक्यता आहे. विरोधकांनी अधिवेशनात विविध सूत्रांवर सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे.

गोवा : यंदाही अनुदानात वाढ न झाल्यामुळे शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणारे मूर्तीकार अप्रसन्न !

स्थानिक हस्तकला जोपासण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात, मग श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठी अनुदानात वाढ करण्यास कोणती अडचण ?