विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यात निमलष्करी दलाच्या ५५ पथकांची नेमणूक हे गोव्याला लज्जास्पद !

‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी गोवा पोलिसांनी संपूर्णपणे पूर्वसिद्धता केल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी सांगितले.

गोव्यात आतापर्यंत रोख रक्कम, मद्य, अमली पदार्थ मिळून एकूण १० कोटी १३ लक्ष रुपये किमतीचे साहित्य कह्यात !

निवडणुकीच्या वेळी नागरिकांना लाच म्हणून पैसे, मद्य, अमली पदार्थ आणि भेटवस्तू दिल्या जातात, हे लोकशाहीला लज्जास्पद !

मतदारराजा, सावध हो ! चेंडू आपल्या रिंगणात आला आहे !

गोव्यातील जनता सुशिक्षित, सुसंस्कृत, विवेकशील, धार्मिक आणि शांतीप्रिय म्हणून प्रसिद्ध आहे. आदर्श राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने इथे दिलेल्या आवश्यक घटकांचा ते नक्कीच विचार करतील, ही अपेक्षा ! या पार्श्वभूमीवर मतदारांना सावध आणि सतर्क करण्याचा अन् त्यांना त्यांच्या दायित्वाची जाणीव करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न !

भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करत असल्याचा काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांचा आरोप

काँग्रेसचे सुनील कवठणकर म्हणाले, ‘‘लोकशाहीची तत्त्वे धोक्यात आली आहेत. भाजपचे नेते १० किंवा त्याहून अधिक समर्थकांसह त्यांचा प्रचार करत आहेत; परंतु त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही.

निवडणूक : खोटी आमिषे आणि लाच देण्याचा हंगाम !

मतदारांना लाच देणे यांची सूची न संपणारी ! विनामूल्य वस्तू, सुविधा आणि अनुदाने यांचे पैसे कुणाच्या खिशातून दिले जाणार आहेत ? अशा प्रकारे हे तथाकथित लोकप्रतिनिधी लाच देऊ करतात; कारण ‘लोकच लाच मागतात’ कि ‘नेत्यांचीच लाचखोर वृत्ती आहे ?’ ‘यथा प्रजा तथा राजा’ कि ‘यथा राजा तथा प्रजा’ ?

निवडणूक आचारसंहिता आणि कोरोनाविषयक निर्बंध डावलून मोरजी येथे संगीत रजनीचे आयोजन

निद्रिस्त गोवा पोलीस आणि प्रशासन ! कोरोनाविषयक आणि निवडणूक आचारसंहिता यांच्याविषयीचे नियम न पाळता शेकडो पर्यटक संगीताच्या तालावर नाचत असल्याचे दिसून आले. पोलीस आल्याचे कळताच आयोजकांनी वीजपुरवठा बंद केला.

गोवा शासनाने कोरोनाविषयक निर्बंधांचा कालावधी १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवला

शाळा, महाविद्यालये आणि उच्च शिक्षण देणार्‍या संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंद रहाणार आहेत; मात्र शिक्षक ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यासाठी शाळांमध्ये उपस्थित रहाणार !

काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडून आल्यास पक्षांतर न करण्याची पणजी येथील श्री महालक्ष्मीदेवीसमोर घेतली शपथ

स्वार्थासाठी पक्षांतर करणारे पक्षद्रोही म्हणजेच राष्ट्रद्रोही असतात, हे खरे; पण ‘गोव्यात सुराज्य आणू’, अशी शपथ घेतली असती, तर ते जनतेला अधिक आवडले असते !

पोलिसांनी पर्वरी येथे धाड टाकून आंतरराष्ट्रीय जुगाराचे रॅकेट उघडकीस आणले

पोलिसांनी संशयितांकडून भ्रमणभाष संच, भ्रमणसंगणक, आय-पॅड, ‘गेमिंग चिप्स’ आणि रोक रक्कम मिळून एकूण २५ लक्ष रुपये किमतीचे साहित्य कह्यात घेतले आहे.

गोव्यात कोरोनाचा प्रकार ‘ओमिक्रॉन’ कि ‘डेल्टा’ प्रभावी आहे, याविषयी अजूनही अनिश्‍चितता

गोव्यात कोणतीही चाचणी न करता प्रवासी परराज्यांतून येत असल्याने गोव्याला मोठा धोका संभवत आहे. गोव्याच्या सीमांवर केवळ कोरोनाची लस न घेतलेल्यांचीच चाचणी केली जात आहे.