गोमेकॉतील ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होऊन रुग्ण दगावण्याच्या घटनेला १ मास होऊनही अन्वेषण समितीकडून अहवाल नाही !

अन्वेषण करून योग्य उपाययोजना तर नाहीच; उलट अशा समित्यांच्या सदस्यांच्या मानधनापोटी शासनाने लक्षावधी रुपये खर्च होत रहातात !

गोव्यात प्रवेश करण्यासाठी ‘कोरोना निगेटिव्ह’ दाखला बंधनकारक

राज्यात प्रवेश करण्यापूर्वी अधिकाधिक ७२ घंटे अगोदर कोरोनाविषयीची चाचणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले आहे.

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे संशयित महिला सालेली येथे पोलिसांच्या कह्यात : अर्भक सुरक्षित

दिवसाउजेडी सार्वजनिक ठिकाणी घडणार्‍या अशा घटना हा राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला काळीमा आहे !

राज्यातील सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर पर्यटन व्यवसाय चालू करावा ! – पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर

कोरोनामुळे गेल्या २ वर्षांत पर्यटन विकास महामंडळाची मोठ्या प्रमाणात हानी !

गोव्यात संचारबंदीत ३१ मे पर्यंत वाढ

संचारबंदीसाठी लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्वीप्रमाणेच असतील. संचारबंदीच्या काळात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने चालू रहातील.

तौक्ते चक्रीवादळामुळे वीज खात्याची २५ कोटी रुपयांची हानी

वीज खात्याच्या अल्प दाबाच्या विद्युतवाहिनीचे जवळजवळ ७०० ते ८०० खांब मोडले आहेत, तर उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे १०० हून अधिक खांब मोडले आहेत. वीजपुरवठा करणारी ३० हून अधिक ट्रान्सफॉर्मर केंद्रे निकामी झाली, तर २०० ट्रान्सफॉर्मर केंद्रे नादुरुस्त झाली आहेत.

गोव्यात दिवसभरात ४५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ३५८ नवीन रुग्ण

गोव्यात १८ मे या दिवशी ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. यांपैकी गोमेकॉमधील २६, तर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला आणि उर्वरित मृत्यू अन्य आरोग्य केंद्रात झाले. यामुळे कोरोनामृतांची संख्या २ सहस्र १९७ झाली आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे गोव्यात वीज खात्याची मोठ्या प्रमाणावर हानी

गोवा राज्यात १६ मे या दिवशी धडकलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे वीज खाते आणि कृषी उत्पादने यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे, तसेच शेकडो घरांची पडझड झाली आहे.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिका मिळत नसल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची होत आहे परवड !