पोलिसांनी पर्वरी येथे धाड टाकून आंतरराष्ट्रीय जुगाराचे रॅकेट उघडकीस आणले

पणजी, २२ जानेवारी (वार्ता.) – पोलिसांनी पर्वरी येथे धाड टाकून आंतरराष्ट्रीय जुगाराचे रॅकेट उघडकीस आणले आहे. यामध्ये बंदी घालेल्या चिनी ‘पोकर अ‍ॅप’चा वापर केला जात असल्याचे उघडकीस आले आहे.

या धाडीमध्ये पोलिसांनी संशयित शशांक सिंह (रहाणारा पाटलीपुत्र, बिहार), रजनीश कुमार (बिहार) आणि अनुप पलोड (रहाणारा, मध्यप्रदेश) यांना कह्यात घेतले आहे. पोलिसांनी संशयितांकडून भ्रमणभाष संच, भ्रमणसंगणक, आय-पॅड, ‘गेमिंग चिप्स’ आणि रोक रक्कम मिळून एकूण २५ लक्ष रुपये किमतीचे साहित्य कह्यात घेतले आहे.