गुजरातमध्ये गणेशमूर्तींच्या उंचीवरील निर्बंध रहित !

वर्ष २०२१ मधील कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक गणेशोत्स्व मंडळांच्या गणेशमूर्तींची उंची ४ फूट आणि घरगुती गणेशमूर्ती २ फूटांहून अधिक असू नये, असे निर्बंध घालण्यात आले होते.

वर्ष २०२३ पासून पीओपी मूर्तीवर बंदी घालणार ! – मुंबई महापालिका

शाडूच्या मातीच्या मूर्ती पर्यावरणस्नेही असल्याने त्यांचाच वापर करावा’, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. उच्च न्यायालयानेही ती बंदी योग्यच असल्याचे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी ‘पीओपी’च्या मूर्तीला अनुमती द्यावी’, अशी मागणी केली होती.

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’वरील बंदी !

प्रदूषण गणेशोत्सवामुळे होते कि शासकीय अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा किंवा भ्रष्टता यांमुळे होते ? ते लक्षात येते. शाडू मातीच्या मूर्तींचा पर्यायही उपलब्ध करून द्यायचा नाही आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरही बंदी आणायची अन् असे करून हिंदूंना कोंडीत पकडायचे, हा हिंदूंच्या गणेशोत्सवावर केलेला मोठा आघातच नव्हे का ?

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती बनवणाऱ्या कामगारांना सातारा नगरपालिकेची नोटीस !

आगामी गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती बनवणाऱ्या कामगारांना नोटीस पाठवली आहे.

 ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’वरील बंदी योग्यच !

‘पीओपी’च्या मूर्तींमुळे जलप्रदूषण होत असल्याच्या कारणावरून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्ष २०१० मध्ये ‘पीओपीचा वापर करू नये’, याविषयी मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली होती.

सोलापूर येथे ‘पीओपी’च्या ४ लाख श्री गणेशमूर्तींच्या विक्रीचा पेच !

मूर्तीकारांना चिकणमाती अथवा अन्य पर्याय उपलब्ध करून दिले नाहीत. आता सिद्ध झालेल्या मूर्तींविषयी मूर्तीकारांचे शंकानिरसन प्रशासन करणार का ? यातून प्रशासनाचा ढिसाळ कारभार दिसून येतो.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती उत्पादनावर बंदी !

प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घालत असतांना प्रशासनाने मूर्तीकारांना शाडूमाती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे !

‘एन्.आय.एफ.’ आणि ‘ट्रायकोलर इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड’कडून गायीच्या शेणापासून श्री गणेशमूर्ती सिद्ध करण्यास प्रोत्साहन !

शास्त्रानुसार एखाद्या वस्तूमध्ये एखादे तत्त्व असेल, तर तेथे दुसरे तत्त्व येत नाही. त्यामुळे निसर्गत:च गोमातेचे तत्त्व असलेल्या गोमयात श्री गणेशतत्त्व आकर्षिले जाऊ शकत नाही.

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव यांसाठी मूर्ती पर्यावरणपूरक शाडू मातीच्याच असाव्यात !

‘मूर्ती शाडू मातीची असावी’, असे धर्मशास्त्र सांगते. हिंदु धर्मशास्त्राचे आचरण केल्यास पर्यावरणाला कोणतीही हानी पोचत नाही. त्यामुळे पुणे महापालिकेचा पर्यावरणपूरक, तसेच शाडू मातीच्या मूर्तीचा निर्णय निश्चितच अभिनंदनीय !

पार्थिव गणेशपूजनाच्या पुराणातील परंपरेनुसार शेती करणारे श्री. राजेंद्र भट !

श्री. राजेंद्र भट गेल्या दीड दशकापासून प्रयोगशील शेती करतात. शेतभूमीचा कस वाढावा, यासाठी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची पुराणातील परंपरा भट यांच्या वाचनात आली.