दरड आणि पूर यांमुळे राज्यात ६ सहस्र कोटी रुपयांच्या हानीचा अंदाज !

पिकांची हानीभरपाई, रस्ते, वाहून गेलेल्या पुलांची बांधणी, कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचे पुनर्वसन करणे, तसेच लोकांना साहाय्य करणे आदींसाठी अर्थसाहाय्य देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.

चिपळूण येथील ३०० पूरग्रस्त कुटुंबांना ब्राह्मण महासंघाच्या वतीने एका मासाचे ‘किराणा किट’ 

चिपळूण शहरातील पूर ओसरत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांकडून साहाय्य कार्याला पुन्हा एकदा प्रारंभ झाला आहे. अशा वेळी साहाय्याचे अनेक हात पुढे येत आहेत.

सांगलीत पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांकडून पूरग्रस्तांना अहोरात्र साहाय्य !

पू. भिडेगुरुजी धारकर्‍यांसह केवळ दिवसाच नाही, तर रात्री-अपरात्री स्वत: पुराच्या पाण्यात उतरून पूरग्रस्तांना लागेल ते साहाय्य करत होते.

निर्धारित केलेल्या मूल्यापेक्षा अधिक दराने विक्री केल्यास संबंधित आस्थापन आणि दुकान यांवर कारवाई ! – जे.एस्. पाटील, उपनियंत्रक, वैध मापनशास्त्र

अशा कारवाईसाठी अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

महापुराच्या काळात सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून पूरग्रस्तांना साहाय्य !

पूरग्रस्तांना पाण्यातून बाहेर काढणे, सुरक्षित ठिकाणी नेणे, त्यांना भोजन-पाणी देणे, त्यांच्या निवार्‍याची सोय करणे, त्यांना औषधोपचार देणे यांसह अनेक गोष्टी यातील कार्यकर्त्यांनी सेवाभावी वृत्तीने केल्या.

भिलवडी (जिल्हा सांगली) येथील बाजारपेठेची उपमुख्यमंत्र्यांनी केली बोटीच्या साहाय्याने पहाणी  

प्रतिवर्षी भिलवडी गावाला पुराचा मोठा फटका बसतो, या वर्षीही या गावात पुराचे पाणी आल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

४ दिवसांनंतर पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अवजड आणि अत्यावश्यक वाहतुकीसाठी चालू : सांगलीत संथगतीने पुराला उतार

यात प्रामुख्याने दूध, इंधन, पाणी, प्राणवायू घेऊन जाणारी वाहने सोडण्यात येत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांगलीत पूर परिस्थितीची पहाणी !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी अजित पवार यांना पूर परिस्थितीची माहिती दिली. उपमुख्यमंत्र्यांनी ‘ड्रोनद्वारे’ही पुराची पहाणी केली.

सातारा जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनांत ३७ नागरिकांचा मृत्यू !

सातारा जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे हाहा:कार उडाला असून जिल्ह्यातील विविध घटनांमध्ये ३७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाण्याच्या पातळीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ५ सहस्र ६५६ नागरिकांचे स्थलांतर करावे लागले आहे.