भिलवडी (जिल्हा सांगली) येथील बाजारपेठेची उपमुख्यमंत्र्यांनी केली बोटीच्या साहाय्याने पहाणी  

उपमुख्यमंत्री अजित पवार पूरग्रस्तांशी संवाद साधताना

भिलवडी (जिल्हा सांगली) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील शाळेत जाऊन पूर छावणीला भेट दिली, तसेच या शाळेमध्ये पूरग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला. येथील बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली आहे. पाणी भरलेल्या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री जयंत पाटील यांनी बोटीच्या साहाय्याने पहाणी केली. प्रतिवर्षी भिलवडी गावाला पुराचा मोठा फटका बसतो, या वर्षीही या गावात पुराचे पाणी आल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

या वेळी अजित पवार म्हणाले की, भिलवडी परिसरातील ज्या भागांतील घरे  आणि रहिवासी यांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचे सर्व्हेक्षण करा. तसेच वारंवार पुराचा फटका बसणार्‍या घरांचे उंचावरील जागेत पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने करून द्या. संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.