सातारा जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनांत ३७ नागरिकांचा मृत्यू !

सातारा, २६ जुलै (वार्ता.) – सातारा जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे हाहा:कार उडाला असून जिल्ह्यातील विविध घटनांमध्ये ३७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाण्याच्या पातळीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ५ सहस्र ६५६ नागरिकांचे स्थलांतर करावे लागले आहे. पाटण तालुक्यातील आंबेघर येथे भूस्खलन झाल्यामुळे ११, रिसवड-ढोकवली येथे ६, काहेरी येथे १, तर मिरगाव येथील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग चालू असल्याने पूर ओसरण्यास अजून काही कालावधी लागू शकतो.