सांगली, २७ जुलै – जिल्ह्यात पूरस्थिती असून या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची कमाल विक्री मूल्यापेक्षा (सर्व करांसहीत) अधिक दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी निर्धारित केलेल्या मूल्यापेक्षा अधिक दराने विक्री केल्यास संबंधित आस्थापन, दुकान यांवर कारवाई करण्यात येईल, असे वैध मापनशास्त्र उपनियंत्रक श्रीमती जे.एस्. पाटील यांनी कळवले आहे. अशा कारवाईसाठी अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र कार्यालय, सांगली ०२३३ – २६०००५३, निरीक्षक वाय.एस्. अग्रवाल ७७७५० ७७७८७, निरीक्षक एम्.आर्. जोशी ९३५९२ २३७७४ या क्रमांकावर संपर्क साधावा.