सांगली, २७ जुलै (वार्ता.) – सांगलीत आलेल्या महापुराने सांगलीकरांची दैना उडाली. गावभागासह अनेक उपनगरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला. गावभागासह अनेक उपनगरांची अवस्था बेटासारखी झाली आणि तेथे होडीशिवाय अन्य कोणतेच संपर्क साधन राहिले नाही. अशा स्थितीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि त्यांचे धारकरी या पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी धावून गेले. पू. भिडेगुरुजी धारकर्यांसह केवळ दिवसाच नाही, तर रात्री-अपरात्री स्वत: पुराच्या पाण्यात उतरून पूरग्रस्तांना लागेल ते साहाय्य करत होते. आवश्यक तिथे साहित्य पोचवणे, पूरग्रस्तांना धीर देणे, पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी पोचवणे यांसह जे जे आवश्यक आहे ते सर्व पू. भिडेगुरुजी यांनी पूरग्रस्तांसाठी केले.
१. धारकर्यांच्या एका तुकडीने पूर येऊन गेल्यानंतर अनेक नागरिकांना घरे स्वच्छ करणे, परिसरातील मंदिरे स्वच्छ करणे या कामात पुढाकार घेतला आहे. २७ जुलैला फौजदार गल्ली येथील श्री विठ्ठल मंदिर स्वच्छ करण्यात आले. या सेवाकार्यात सर्वश्री अमित करमुसे, संभाजीराव भोसले, प्रताप बाणकर, अश्विन पालकर, प्रथमेश सरगर, श्रीधर बंडगर, कृष्णा यादव, चंद्रशेखर जगताप यांसह अनेक धारकरी सहभागी झाले आहेत.
२. धारकरी श्री. राहुल बोळाज यांचे विवेकानंद क्लबनावाचे मंडळ असून त्यांच्याकडे असलेल्या बोटीच्या साहाय्याने पूरग्रस्तांना बाहेर काढणे, त्यांना भोजन, दूध, पाणी, तसेच जीवनावश्यक साहित्य पुरवणे असे साहाय्य करण्यात येत होते. या मंडळाने गावभाग, कापडपेठ, पत्रकारनगर, तसेच अन्य भागांतील पूरग्रस्तांची सुटका केली. श्री. राहुल बोळाज यांनी स्वखर्चाने पूरग्रस्तांना दूध, कांदे-बटाटे, भाजी आणून दिली. ज्या ज्या ठिकाणी वीज नाही तेथे वीज कर्मचार्यांना नेऊन वीजप्रवाह चालू करून देणे, असे कार्य चालू आहे.
या सेवाकेंद्रात श्री शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री राहुल बोळाज, अवधूत रणदिवे, विवेक रणदिवे, पंकज बोळाज, ऋतु बोळाज, महेश दडगे, अभि ओतारी, राहुल ओतारी, दिगू माळी, शुभम वेसणेकर, युवराज निंबाळकर सहभागी झाले होते.