राज्यात फळपीक विम्याची साडेचौदा सहस्र बोगस प्रकरणे !

सोलापूर जिल्ह्यात एकूण ४ सहस्र ४१३ विमा अर्जदारांपैकी २ सहस्र ७१३ बोगस विमा प्रकरणे, तर जळगाव जिल्ह्यात एकूण ७८ सहस्र ४३० विमा अर्जदारांपैकी १९ सहस्र ९७२ अर्जांची पडताळणी झाली असून १ सहस्र १४५ बोगस विमा प्रकरणे आढळून आली आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे ३ मासांत महाराष्‍ट्रात ९५ जण मृत्‍यूमुखी !

नैसर्गिक आपत्तीमुळे मार्च ते मे २०२३ या कालावधीत महाराष्‍ट्रातील ९५ जण मृत्‍यूमुखी पडले आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी १८ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.

स्थगन प्रस्तावावरील चर्चेस अध्यक्षांच्या नकारामुळे विरोधकांचा सभात्याग !

दुबार पेरणीची वेळ आल्यास सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. आम्ही शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. बनावट बियाणांच्या विरोधात कायदा अधिक कडक करण्यात येईल-देवेंद्र फडणवीस

गोसीखुर्द धरणाच्या तांत्रिक दोषयुक्त वितरिकेमुळे शेतपिके पाण्याखाली !

शेतकर्‍यांची होणारी आर्थिक हानी कोण भरून काढणार ?

राज्‍यातील ९ जिल्‍ह्यांत अनधिकृत विनापरवाना कापूस बियाण्‍याची विक्री !

शेजारील राज्‍यातून आणून महाराष्‍ट्रात बियाण्‍यांची विक्री केली जाते. अनेक ठिकाणी घरांमध्‍ये साठा करून गुपचुप विक्री करण्‍यात येते. कृषी विभागाच्‍या गुणवत्ता नियंत्रण पथकांच्‍या वतीने अशा चोरट्या विक्रेत्‍यांवर कारवाई करण्‍यात येत आहे.

शेतमालाला भाव आणि नोकरी द्या, अन्‍यथा गोळ्‍या तरी घाला !

युवा शेतकर्‍यांनी गावातून फेरी काढली. त्‍यानंतर बैठकीत गावातील असंख्‍य युवकांनी स्‍वतःच्‍या स्‍वाक्षरीने पत्र लिहिले.

८५० रुपयांचे कापसाचे बियाणे तब्‍बल २ सहस्र ३०० रुपयांना विकून शेतकर्‍यांची फसवणूक चालू !

राज्‍यात बनावट बियाणे आणि वाढीव दराने त्‍यांची विक्री करणार्‍या लोकांविरोधात धाडसत्र चालू आहे. शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या लोकांना सोडणार नाही, अशी भूमिका कृषीमंत्री अब्‍दुल सत्तार यांनी स्‍पष्‍ट केली आहे

तिवरे (तालुका चिपळूण) गावात बीजारोपण आणि रोपवाटिका निर्मितीसाठी ५० सहस्र बीजप्रदान  !

विविध कारणांनी ब्रिटीशांच्या काळात देवरायांची, जंगलांची अधिकची तोड चालू झाली, ती आजही चालू आहे. तिचे परिणाम आपण अनुभवतो आहोत. म्हणून देशी जंगली वृक्षांचे बीजारोपण आणि वृक्षारोपण काळाची आवश्यकता आहे.

आता बनावट बियाणे विकणार्‍यांना १० वर्षांची शिक्षा ! – अब्दुल सत्तार, कृषीमंत्री

यापुढे बनावट बियाणे विकणार्‍यांना १० वर्षांची शिक्षा होणार असून यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात कायदा आणला जाणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. येथील दैनिक ‘लोकमत’च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते बोलत होते.

९ राज्‍ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश येथे अल्‍प पाऊस पडणार !

महाराष्‍ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, ओडिशा, बंगाल या राज्‍यांसह इतर ४ केंद्रशासित प्रदेशांमध्‍ये या वर्षी अल्‍प पाऊस होण्‍याची शक्‍यता हवामान तज्ञांनी वर्तवली