कागल (जिल्हा कोल्हापूर) – पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके, तर जनावरांच्या लंपी आजारामुळे दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. शासनाने शेतकर्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, यांसाठी हेक्टरी १५ सहस्र रुपयांचे सहकार्य घोषित करावे आणि कागल (कोल्हापूर) तालुक्यात दुष्काळ घोषित करा, या मागणीचे निवेदन ठाकरे गट आणि हसुरखुर्द ग्रामस्थ यांच्या वतीने तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना देण्यात आले. तहसीलदारांनी शेतकर्यांच्या अडचणी समजून घेत संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या.