‘जी-२०’मध्ये जगन्नाथ मगर नैसर्गिक शेतीविषयीची यशोगाथा सादर करणार !

सोलापूर – शेतीमध्ये सेंद्रीय उत्पादने, विषमुक्त शेती, पशूपालन, रेशीम कोष निर्मिती यांसारखे प्रयोग करणारे श्री. जगन्नाथ मगर यांची यशोगाथा ‘जी-२०’ शिखर परिषदेत सादर केली जाणार आहे. श्री. जगन्नाथ मगर यांची निमगाव (तालुका माळशिरस) येथे १५ एकर शेती आहे. त्यांनी शेतामध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर बंद करून गोपलन करत गायीचे शेण आणि गोमूत्र यांचा वापर चालू केला. त्यामुळे भूमीचा सेंद्रिय कर्ब वाढला. भूमीतील जैविक घटकांमुळे भूमीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढली. ९ सप्टेंबरपासून देहली येथे चालू झालेल्या ‘जी-२०’ शिखर परिषदेत श्री. मगर हे त्यांची भारतीय नैसर्गिक शेतीविषयीची यशोगाथा सादर करणार आहेत.

संपादकीय भूमिका

सर्वच शेतकर्‍यांनी श्री. मगर यांचा आदर्श घेऊन नैसर्गिक शेती करण्याकडे वळावे !