नैसर्गिक शेतीविषयीच्या अपप्रचारांचे खंडण

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

अपप्रचार : ‘तुम्ही रासायनिक शेती करत असाल, तर एकाएकी नैसर्गिक शेतीकडे वळू नका. तसे केल्यास तुमचे उत्पन्न घटेल.

खंडण : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत पूर्वी कुरुक्षेत्र, हरियाणा येथील त्यांच्या गुरुकुलाच्या ९० एकर शेतामध्ये रासायनिक शेती करत असत. शेतीमध्ये हानीकारक रसायनांची फवारणी करतांना रसायनांच्या दुष्प्रभावामुळे एकदा त्यांचा एक कामगार बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्या वेळी आचार्य देवव्रत यांनी विषारी शेतीला पर्याय म्हणून नैसर्गिक शेती करून पहायचे ठरवले. प्रयोग म्हणून त्यांनी पहिल्या वर्षी ९० पैकी १० एकर क्षेत्रामध्ये नैसर्गिक शेती केली. पहिल्याच वर्षी त्यांना रासायनिक शेतीत मिळायचे तेवढेच उत्पन्न मिळाले. उत्पन्नात घट झाली नाही. त्यानंतर त्यांनी पूर्ण ९० एकर क्षेत्रामध्ये नैसर्गिक शेती केली. त्या वेळी त्यांना रासायनिक शेतीपेक्षाही जास्त उत्पन्न मिळाले. नैसर्गिक शेती समजून घेऊन योग्य प्रकारे आचरणात आणली, तर उत्पन्नात अजिबात घट होत नाही.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३०.७.२०२२)

(सविस्तर माहितीसाठी ‘सनातन संस्थे’च्या संकेतस्थळाची मार्गिका किंवा QR code : https://www.sanatan.org/mr/a/84133.html)