नक्षलवाद्यांचा बीमोड !

नक्षलवाद्यांचा बीमोड !

नक्षलवादी प्रशिक्षित असल्यामुळे त्यांना कमांडोच नियंत्रणात आणू शकतात. महाराष्ट्राकडून दिशा घेऊन अन्य राज्यांनी प्रयत्न केल्यास नक्षलवादाचे भारतभरातून उच्चाटन करणे सहज शक्य होईल, हे खरे !

रझा अकादमीची दंगल नियोजनबद्धच !

रझा अकादमीची दंगल नियोजनबद्धच !

‘मुसलमानांचे लांगूलचालन करणे’ हाच पाया असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून ही अपेक्षा नाही; मात्र हिंदुत्वाचा पाया असलेल्या भाजप आणि शिवसेना यांनी रोखठोक भूमिका घ्यावी, हिंदूंना सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती निर्माण करावी, ही हिंदूंची अपेक्षा आहे.

‘लाल परी’ रुसली !

‘लाल परी’ रुसली !

महामंडळाला तोटा होऊ लागला, तेव्हापासूनच सावध होऊन ठोस उपाययोजना काढून त्याला वर काढले असते, तर आज ही वेळ आली नसती. सामान्यांसाठी वरदान ठरलेल्या वाहतूक यंत्रणेची जोपासना झाली असती, तर ही वेळ आली नसती.

प्रदूषित यमुनेवरील श्रद्धा !

प्रदूषित यमुनेवरील श्रद्धा !

हिंदु धर्मियांमध्ये एकीकडे धर्माचरण अल्प होत असतांना अजूनही पूजेसाठी काही महिला अशा प्रकारचा भाव ठेवून प्रदूषित नदीमध्ये पूजा करत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. ते नाकारताही येणार नाही. या महिलांचे त्यांच्या भावामुळे देव रक्षण करील, त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवील.

रुग्णालयांतील आगी !

रुग्णालयांतील आगी !

महाराष्ट्रातील नगर जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयातील अतीदक्षता विभागाला ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीमध्ये ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा रुग्णालयांमध्ये लागणार्‍या आगीचे सूत्र ऐरणीवर आले

शिक्षणसंस्थांचा दर्जा सुधारणार केव्हा ?

शिक्षणसंस्थांचा दर्जा सुधारणार केव्हा ?

अनेक कला आणि विद्या यांचे माहेरघर खरे तर भारत आहे. मुख्य म्हणजे आता सध्या जग हे ज्या हिंदु धर्माच्या प्रेमात पडत आहे, त्याच्या धर्मग्रंथांचे शास्त्रशुद्ध शिक्षण भारतीय विद्यापिठांमध्ये देण्यास प्रारंभ करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपोआपच परदेशींचा भारताकडे ओढा वाढेलच आणि भारतालाच ते अधिक लाभदायक होईल !

सीमाभागातील मराठी जनांना न्याय कधी ?

सीमाभागातील मराठी जनांना न्याय कधी ?

तत्कालीन केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात मराठी भाषिक ६५ वर्षांपासून त्यांच्या या अधिकारासाठी लढत असून अजूनही ते न्यायाच्याच प्रतीक्षेत आहेत. केंद्रशासनानेच पुढाकार घेऊन या प्रश्नावर मार्ग काढणे अत्यावश्यक आहे.