ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी

पुणे – हवेली तालुक्यातील हिंगणगाव ते खामगाव टेक येथील मुळा-मुठा नदीवरील २४ कोटी रुपये व्यय करून बांधण्यात येत असलेल्या पुलाचा काही भाग पहिल्याच पावसात कोसळला. या पुलाचे मोठे ‘स्लॅब’ (छत) आणि उभारलेले खांब (पिलर) पडले आहेत. या पुलाचे बांधकाम ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’च्या (पी.एम्.आर्.डी.ए.च्या) माध्यमांतून होत आहे. आता पहिल्याच पावसात पूल कोसळल्याने भविष्यात या पुलाच्या मजबुतीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ठेकेदाराला (मे.टी.अँड टी. इन्फ्रा लि., पुणे) देयक मान्य करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांना २० ते ३० टक्के ‘कमिशन’ (दलाली) द्यावे लागते. या टक्केवारीमुळे ठेकेदार अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करतात, असा थेट आरोप जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अलंकार कांचन यांनी केला. पुलाची अशी दुरवस्था होऊनही अद्याप एकही अधिकारी किंवा ठेकेदार घटनास्थळी आला नसल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी कांचन यांनी केली.
पी.एम्.आर्.डी.ए.च्या जनसंपर्क विभागाने सांगितले की, संबंधित पुलाचे काम अद्याप चालू आहे. गर्डर खांबावरून खाली पडले असून ते पूर्ववत् बसवणे, आवश्यक ती दुरुस्ती करणे आणि काम पूर्ण करणे हे ठेकेदाराचे दायित्व आहे. घटनेची तांत्रिक कारणे शोधून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस !
नाशिककरांना ५० अत्याधुनिक वातानुकूलित ई-बसगाड्या मिळणार !
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !