भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार

मनोज मुंतशीर, संगीतकार

मुंबई – जे लोक ‘भारताचे तुकडे केले जातील’, अशा घोषणा देतात आणि ‘काश्मीर हा भारताचा भाग नाही’, असे म्हणतात, तेव्हा अशांना मी अत्यंत दायित्वपूर्वक ‘देशद्रोही’ म्हणतो. ते प्रभु श्रीरामाचा उल्लेख केवळ ‘सीतेचा पती’ असा करतात, हे अत्यंत अपमानजनक आहे, असे विधान संगीतकार आणि कवी मनोज मुंतशीर यांनी एका मुलाखतीत केले. ‘मी कधीही जंतरमंतरवर जाणार नाही; कारण तेथे प्रतिनिधित्व करणारे लोक दुर्दैवाने अशा प्रकारचे नाहीत की, ज्यांच्यासोबत उभे रहाणे मला सोयीचे वाटेल’, असेही ते म्हणाले.

२० जुलै या दिवशी देहलीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार आणि हिंसाचार झाला, त्या प्रकरणी ते बोलत होते. ‘नीटची प्रश्नपत्रिका फुटणे ही घटना चुकीचीच होती. जर एकाही विद्यार्थ्याचा जीव गेला असेल, तर त्यासाठी संपूर्ण यंत्रणा उत्तरदायी आहे’, असे त्यांचे म्हणणे होते.