‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण
(नीट – NEET – नॅशनल एलिजिबिलिटी कम ॲन्ट्रन्स टेस्ट – राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा)

पणजी, २३ जुलै (वार्ता.) – ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटल्याच्या (पेपरफुटीच्या) प्रकरणांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलद निपटारा करण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक’ (जलद गती) न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वागत केले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सामाजिक माध्यमात याविषयी म्हणाले, ‘‘पेपरफुटीच्या प्रकरणी केंद्रशासनाची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. केंद्रशासन तरुणांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड करणार नाही. पेपरफुटीच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह करण्यासाठी व्यापक सुधारणा राबवण्यात आल्या आहेत.’’
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)
हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !