देहलीतील आंदोलने परदेशी निधीतून ‘प्रायोजित’ ! – रवींद्र चव्हाण, भाजप
नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या शिखरावर पोचत असतांना देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आणि स्वतःची राजकीय भूमिका राबवण्यासाठी परकीय शक्तींचा वापर केला जात आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. देहली येथे चालू असणार्या आंदोलनांना परदेशातून आर्थिक रसद पुरवली जात असून या राष्ट्रविरोधी षड्यंत्राचे मुख्य सूत्रधार कोण आहेत ? हे सत्य लवकरच जनतेसमोर आणले जाईल, अशी चेतावणीही त्यांनी दिली.
डोंबिवली येथे तलावात बुडून दोघांचा मृत्यू
डोंबिवली – येथील दावडी बंदर तलावावर पोहण्यासाठी गेलेले संतोष सियाराम मौर्या (वय २९ वर्षे) आणि भीमेश्वर उपाख्य सुंदर बलबाहदुर भंडारी (वय २४ वर्षे) या २ तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. भोजन झाल्यानंतर ते पोहण्यासाठी तलावात उतरले; मात्र मुसळधार पावसामुळे काठोकाठ भरलेल्या तलावातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडले. मानपाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस !