
पंढरपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसूर पाटी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाचे काही वेळ सारथ्यही केले.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी अन् समाधानी राहू दे’’, असे साकडे त्यांनी माऊलींच्या चरणी घातले. वारीतील वारकरी हे माऊलीचे जिवंत स्वरूप असून त्यांच्यासोबत चालण्याचा आनंद वेगळाच असल्याचे त्यांनी सांगितले. वारीत वारकर्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांचेही त्यांनी कौतुक केले. पालकमंत्री श्री. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून वारकर्यांसाठी स्वच्छता, पिण्याचे पाणी, जर्मन हँगर, आरोग्य सेवा, चरण सेवा उपक्रम, शौचालये आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भाविकांची संख्या मोजली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री श्री. जयकुमार गोरे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस्. कार्तिकेयन् यांनी मुख्यमंत्र्यांना ‘आषाढी वारी २०२६’च्या नियोजनाची माहिती दिली. या वेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)
हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस !