गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजपलाच विजयी करा !

आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघांमध्ये भाजपलाच विजयी करावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फर्मागुडी येथे झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत केले.

राज्य सरकार प्रतिवर्ष काजू महोत्सव साजरा करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

काजू महोत्सवासारख्या महोत्सवामुळे पर्यटक काजू महोत्सवासाठी गोव्यात येणार आहेत. राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी स्थानिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गोव्यातील कला आणि संस्कृती देशपातळीवर नेणे आवश्यक आहे.

समुद्री सुरक्षेसाठी गोवा पोलिसांच्या वेगवान गस्ती नौकेचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते लोकार्पण

‘‘वेगवान गस्तीनौकेमुळे समुद्री भागातील सुरक्षा आणखी भक्कम होणार आहे. तसेच समुद्री भागात आकाशातून लक्ष ठेवण्यासाठी ‘ड्रोन कॅमेरा’ही कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे समुद्री भागासह भूमीवरील सुरक्षाही आणखी भक्कम होणार आहे.’’

किनारपट्टीवरील अवैध कृत्ये थांबवा ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे पोलीस महासंचालकांना आदेश

असे आदेश पोलिसांना का द्यावे लागतात ? अवैध कृत्ये रोखणे हे पोलिसांचे कर्तव्य नाही का ?

स्वयंपूर्ण गोवा अर्थसंकल्पाच्या कार्यवाहीचा कृतीआराखडा ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सर्व सचिवांसमवेत बैठक

अर्थसंकल्पाच्या काटेकोर कार्यवाहीचा निर्णय घेऊन आर्थिक आणि प्रशासकीय दृष्टीने अंदाजपत्रकात घोषित केलेल्या योजना कोणत्या मासापासून चालू होणार ? याचा तपशील देण्याच्या सूचना सचिवांना दिल्या आहेत.

वनक्षेत्र वाढ आणि जैवविविधता टिकवणे यांसाठी गोवा सरकार बांधील ! – मुख्यमंत्री

वर्ष २०१९ च्या तुलनेत वर्ष २०२१ च्या भारत सरकारच्या वन अहवालानुसार गोव्यातील वनक्षेत्रामध्ये ७ चौरस किलोमीटरची वाढ ! वनीकरण निधी व्यवस्थापन योजनेची कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याने वनक्षेत्रात वाढ होत आहे.

गोवा शासनाची स्वयंपूर्ण गोव्याच्या दिशेने वाटचाल !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा शासनाने स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.

महाराष्ट्राकडून विर्डी धरणाचे काम बंद

महाराष्ट्र सरकारने अचानक कुणालाही कल्पना न देता आणि कुणाचीही अनुज्ञप्ती न घेता विर्डी धरणाचे अनधिकृत बांधकाम चालू केले. आता काम बंद असले, तरी ते पुन्हा कधीही चालू होऊ शकते. सरकारने संबंधित ठिकाणी कायम पाळत ठेवली पाहिजे.

महाराष्ट्र सरकारकडून ‘विर्डी’ धरणाच्या कामाला पुन्हा प्रारंभ

गोवा सरकारने विर्डी धरणाचे काम त्वरित बंद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या अनुज्ञप्तींविषयी अन्वेषण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

लैंगिक अत्याचारापासून  विदेशी पर्यटकाचे रक्षण करणार्‍या व्यक्तीचा सन्मान होणार !

नेदरलँडस्थित एका पर्यटकावर लैंगिक अत्याचार होण्यापासून रोखणारे युरिको डायस यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ‘शौर्य’ पुरस्कारासाठी युरिको डायस यांच्या नावाची शिफारस केली जाणार आहे.