गोव्यात कोरोना लसीकरण १६ जानेवारीपासून चालू होण्याची शक्यता

देशासमवेत गोव्यातही कोरोना लसीकरण १६ जानेवारीपासून चालू होण्याची शक्यता असून लसीकरणासाठी राज्यातील ८ रुग्णालये निवडण्यात आली आहेत.

मेळावली येथील आय.आय.टी. प्रकल्पाच्या भूसर्वेक्षणाचे काम उद्या चालू रहाणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

मेळावली येथे आय.आय.टी. प्रकल्प उभारण्याविषयी गोवा शासन ठाम आहे. या प्रकल्पाला तेथील स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार येथील अंदाजे १७ ग्रामस्थ कुटुंबीय प्रकल्पासाठीच्या सरकारी भूमीवर लागवड करतात.

नूतनीकरण केलेले आयनॉक्स मल्टीप्लेक्स आणि गोवा मनोरंजन संस्थेचा लोगो यांचे आज उद्घाटन

गोवा मनोरंजन संस्थेचे नूतनीकरण केलेले आयनॉक्स मल्टीप्लेक्स आणि गोवा मनोरंजन संस्थेचा लोगो यांचे उद्घाटन ११ जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता संस्थेच्या संकुलात राज्याचे मुख्यमंत्री तथा गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

आंदोलकांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शेळ-मेळावली येथे जाणार नाहीत ! – सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शेळ-मेळावली येथे नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणार्‍या ग्रामस्थांना भेटण्यासाठी जाणार नाहीत, अशी माहिती भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांना दिली.