भारताचे आणखीन तुकडे होऊ न देण्यासाठी ‘धर्मांतर बंदी’ कायदा आणायला हवा ! – के. उमाशंकर, हिंदु देवालय परिरक्षण समिती, कृष्णा जिल्हा समन्वयक आंध्रप्रदेश

हिंदूंच्या मंदिरांतील निधी हिंदूंसाठी, हिंदु धर्मासाठी वापरला जात नाही, तर तो सरकारी कामांसाठी वापरला जातो. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नाही. त्यामुळे धर्मांतर वाढत आहे.

श्रावण मासातील (२२.८.२०२१ ते २८.८.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

९.८.२०२१ या दिवसापासून श्रावण मास चालू झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

ब्राह्मणद्वेषाची कीड दूर व्हावी !

पुणे शहराच्या काही भागांतील भिंतींवर ब्राह्मणांच्या विरोधात लिखाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हे लिखाण त्वरित पुसले…

साधनेची तीव्र तळमळ असल्याने केवळ १० मासांत ‘वाचक ते कृतीशील धर्मप्रेमी’ हा साधनेचा प्रवास करणार्‍या पुणे येथील धर्मप्रेमी सौ. स्वाती शिंदे !

पुणे येथील ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी सौ. स्वाती शिंदे यांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न अन् त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.

(म्हणे) ‘स्वतःच्या घरात मान मिळत नसल्याने दलित धर्मांतर करतात !’ – बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी

गरीब हिंदूंना आमीष दाखवण्यात येत असल्यानेच त्यांचे धर्मांतर होत आहे, हेच सत्य आहे. हे मांझी का सांगत नाहीत ?

गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षि व्यास यांची वर्णिलेली महती !

महर्षि व्यास हे समाजाचे गुरु होते; म्हणून परंपरागत व्यासपूजा ही गुरुपूजा मानली गेली. व्यासपौर्णिमा ही ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून संपूर्ण भारतवर्षात साजरी होऊ लागली.

पांडुरंग आणि एकादशी यांचे माहात्म्य !

आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्‍या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे.

हिंदु राष्‍ट्र निर्मितीसाठी धर्मशिक्षणाचे महत्त्व !

‘धर्मशिक्षणाने कृती, म्‍हणजे साधना होईल, साधनेने अनुभूती येतील, अनुभूतींनी श्रद्धा वाढेल, श्रद्धेने अभिमान वाढेल, अभिमानाने संघटन वाढेल, संघटनाने संरक्षण निर्माण होईल आणि त्‍यानेच हिंदु राष्‍ट्राचे निर्माण आणि पोषण होईल !’

मृत्‍यूनंतर काही जणांच्‍या तोंडवळा किंवा शरीर यांच्‍यावर हळदीप्रमाणे पिवळसर रंगाची छटा दिसण्‍यामागील अध्‍यात्‍मशास्‍त्र

वाईट शक्‍तींच्‍या आक्रमणांपासून रक्षण होण्‍यासाठी सात्त्विक जिवातील चैतन्‍य तेजतत्त्वाच्‍या स्‍तरावर त्‍याच्‍या संपूर्ण पार्थिव देहावर किंवा तोंडवळ्‍यावर पसरून देहाभोवती चैतन्‍यदायी संरक्षककवच निर्माण होणे.

हिंदूंना हेतूपूर्वक धर्मशिक्षणापासून वंचित ठेवले जाते ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारतात हिंदूंना त्यांचा धर्म, गौरवशाली इतिहास, परंपरा, संस्कृती आणि अध्यात्म यांचे शिक्षण मिळत नाही. त्यांना हेतूपूर्वक धर्मशिक्षणापासून वंचित ठेवले जाते.