कार्तिकस्वामी दर्शन सोहळा २०२०

‘कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.

कार्तिकी एकादशी : संप्रदायाच्या मर्यादा ओलांडून श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत !

एकादशीच्या दिवशी सर्व प्राणीमात्रांची सात्त्विकता वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्याने त्याचा अधिक लाभ होतो. सदर लेखातून कार्तिकी एकादशी हे व्रत करण्याची पद्धत, या दिवशी श्रीविष्णूला बेल आणि शिवाला तुळशीपत्र का वहावे इत्यादी माहिती जाणून घेऊया.

एकादशीचे व्रत कसे करावे ?

‘एकावर एक ११ म्हणजे एकादशी. याचा अर्थ एकत्व सोडू नये. या दिवशी लंघन करणे, उपवास करणे, याचा उद्देश आहे, लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे रहावे; मात्र आता हा अर्थ गौण झाला आहे आणि उपवास प्रधान झाला आहे !

पंढरपूरला आद्य शंकराचार्यांनी ‘महायोगपीठ’ म्हणण्याचे कारण

तीर्थक्षेत्री भक्त देवाच्या किंवा शक्तीपिठावर देवीच्या दर्शनासाठी जात असतात; मात्र पंढरपूरला पांडुरंग भक्त पुंडलिकाची वाट पहात तिष्ठत उभा आहे. परमेश्‍वर भक्ताची वाट पहात आहे; म्हणून हे महायोगपीठ आहे.’

चातुर्मासात एकादशीच्या निमित्ताने काही शब्दांचे अर्थ

१ जुलै या दिवशी आषाढी एकादशी होती. या दिवसापासून चालू झालेल्या चातुर्मासाच्या निमित्ताने प्रत्येक एकादशीला प्रतिदिनच्या वापरातील नेहमीचेच शब्द; परंतु त्या शब्दांचे विशेष आणि नवीन अर्थ उद्धृत करून ते आपणा सर्वांपर्यंत पोचवण्याचा एक प्रयत्न चालू केला आहे.

हट्टी मुले !

उठल्याबरोबर लहान मुलांच्या हातात भ्रमणभाष असतो अथवा दूरचित्रवाणी चालू करून कार्टून पाहून दिवसाचा आरंभ केला जातो. यामध्ये किती घंटे वाया जातात ? आणि त्याचा आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो ? हे मुलांना समजत नसले, तरी पालकांना समजत नसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

‘लॉकडाऊन’च्या काळात विदर्भातील दैवी बालसाधकांनी व्यष्टी साधनेचे चांगले प्रयत्न करणे आणि त्यामुळे साधक अन् पालक यांच्या प्रयत्नांत वाढ होणे

जिल्ह्यांमध्ये या बालसाधकांच्या पालकांचा सत्संग घेण्यात आला. तेव्हा ‘बालसाधकांच्या वाढलेल्या प्रयत्नांमुळे पालकांचे साधनेचे प्रयत्नसुद्धा वाढत आहेत.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘व्यक्तीस्वातंत्र्याने मानव भरकटत जातो; कारण तो सात्त्विक नाही. असे होऊ नये; म्हणून त्याला धर्मबंधन हवे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यावर गोव्यात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी !

देणगीचे हे पैसे शिक्षण, युवकांना रोजगार, सामूहिक कृषी लागवड, आरोग्य रक्षण, क्रीडा सुविधांमध्ये सुधारणा आदींवर खर्च केल्यास योग्य झाले असते. या देणगीचा शेवटी प्रतिमादहन करून धूरच होत असतो. मुलांना योग्य ते देण्याची आता वेळ आली आहे.

दिशाहीन पत्रकारिता नको !

धर्मांधांची आक्रमणे, देशांतर्गत युद्ध, महिलांवरील अत्याचार यांविरुद्ध मोहीम राबवणे आवश्यक असतांना सध्याची पत्रकारिता जनतेला दिशाहीन करत आहे. देश पारतंत्र्यात असतांना नागरिकांना योग्य दिशा देणार्‍या लोकमान्य टिळकांची पत्रकारिता अभ्यासल्यास वृत्तपत्रांना पत्रकारिता कशी असावी, हे निश्‍चित लक्षात येईल.