भारतात प्राचीन गुरुकुल शिक्षणपद्धतीची परंपरा होती. त्यानंतर इंग्रजांनी मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धत चालू केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही तीच शिक्षणपद्धत चालू ठेवली गेली. सध्या भारतात गुरुकुल शिक्षणपद्धती पूर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुसलमानांना मदरशांमध्ये, ख्रिस्त्यांना ‘कॉन्व्हेट’मध्ये त्यांच्या धर्माचे शिक्षण मिळते; पण भारतात हिंदूंना त्यांचा धर्म, गौरवशाली इतिहास, परंपरा, संस्कृती आणि अध्यात्म यांचे शिक्षण मिळत नाही. त्यांना हेतूपूर्वक धर्मशिक्षणापासून वंचित ठेवले जाते.
– श्री. नरेंद्र सुर्वे