आमदार लक्ष्मण जगताप आणि बंधू शंकर जगताप यांच्या वतीने पुणे येथे अपंगांना कृत्रिम अवयवांचे विनामूल्य वाटप !
यामध्ये ३१४ अपंगांना कृत्रिम हात आणि पाय (जयपूर फूट), ‘व्हीलचेअर’ तसेच ‘ट्राय सायकल’ यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले.
यामध्ये ३१४ अपंगांना कृत्रिम हात आणि पाय (जयपूर फूट), ‘व्हीलचेअर’ तसेच ‘ट्राय सायकल’ यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले.
मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते; मात्र गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला ‘आर्थिक राजधानी’ म्हटले जाणार नाही’, असे विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी ‘मराठी अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर लावलेला ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा रहित करावा’, अशी मागणी करणारे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
राज्यातील १३ लाख ८५ सहस्र शेतकर्यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी ५ सहस्र ७२२ कोटी रुपये इतका निधी व्यय करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
आमचे हिंदुत्व सर्वांना समान न्याय देणारे आहे. आमचे सरकार हे हिंदुत्ववादी आणि मराठी माणसासाठी लढणारे आहे.
राज्यात पेट्रालचे दर प्रतिलिटर ५ रुपयांनी, तर डिझेलचे दर प्रतिलिटर ३ रुपयांनी न्यून करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. रात्री १२ पासून हा निर्णय लागू झाला आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर ६ सहस्र कोटी रुपयांचा भार पडेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ज्या राज्याला केंद्रशासनाचा पाठिंबा मिळतो, ते राज्य वेगाने प्रगतीकडे जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही केंद्रीय नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे.
मंत्रालयातील ६ व्या मजल्यावर येऊन एकनाथ शिंदे यांनी ७ जुलै या दिवशी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हात धरून त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवले.
अजून खातेवाटपाचे कोणतेही धोरण ठरलेले नाही. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर लवकरच मंत्रीमंडळ विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलतांना दिली.