
पुणे – ‘महावितरण’च्या पुणे परिमंडलात वीजचोरीच्या विरोधात १ जुलै ते १६ जुलै या कालावधीत महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांच्या निर्देशांनुसार विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ३ लाख ४० सहस्र ७३० युनिट वीजचोरी करणार्या १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. (अशी कारवाई वारंवार होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वीजचोरी होऊच नये, यासाठी ठोस उपाययोजना काढणे आवश्यक आहे. – संपादक) ‘भारतीय विद्युत् अधिनियम २००३’ अंतर्गत मीटरमध्ये फेरफार करणे, थेट आकडा किंवा केबल टाकून वीजचोरी करणे, विजेचा अनधिकृत वापर करणार्यांच्या विरोधात कारवाई करत ८१ लाख ५५ सहस्र रुपये दंड आकारण्यात आला आहे. रास्तापेठ येथे सर्वाधिक ३७५ ठिकाणी ९० सहस्र ७९९ युनिट वीजचोरी करणार्यांना २३ लाख ३० सहस्र रुपये, ग्रामीण भागांत ५८० ठिकाणी ३६ सहस्र ९३० युनिट वीजचोरी करणार्यांना २९ लाख ८२ सहस्र रुपये, तर गणेश खिंड येथे ३२६ ठिकाणी १ लाख १३ सहस्र युनिट वीजचोरी प्रकरणी २८ लाख ४२ सहस्र रुपये दंड आकारण्यात आला आहे. वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून तिची चोरी करणे कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी सांगितले.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !