सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या स्थानांतरणास उपमुख्यमंत्र्यांकडून स्थगिती !

देवेंद्र फडणवीस

सांगली – सांगली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या अखेरच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचे स्थानांतर संभाजीनगर महापालिकेत आयुक्त म्हणून केले होते. सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. अभिजित चौधरी साडेतीन वर्षे कार्यरत आहेत.