
पुणे – म्हाळुंगे येथील बंद असलेल्या ‘एमराल्ड हॉल’चे कंत्राट टिकवून ठेवण्यासाठी ‘कॅटरिंग’ (कॅटरिंग म्हणजे विविध कार्यक्रम, समारंभ यांसाठी अन्नपदार्थ आणि पेये सिद्ध करून देणे) व्यावसायिकाकडून ‘दि पुणे पोस्ट अँड टेलिकॉम को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’च्या संचालकांनी ६० लाख रुपयांची खंडणी मागितली. अजय देसाई यांनी या घटनेची तक्रार प्रविष्ट केली आहे. त्या अन्वये सचिव, संचालक, अध्यक्ष, व्यवस्थापक आदींवर खंडणीचा गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदारांनी स्वखर्चाने नूतनीकरण करून व्यवसाय चालू केला होता. खंडणीच्या धमकीने आणि व्यवसाय बुडण्याच्या भीतीने त्यांनी दागिने तारण ठेवून ३७ लाख ५० सहस्र रुपये दिले; मात्र उर्वरित पैसे न दिल्याने कराराची मुदत डिसेंबर २०२६ पर्यंत असतांनाही त्यांना हॉलमधून हाकलले असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !
पुणे महापालिका समान आणि पुरेसे पाणीपुरवठा योजनेची ‘श्वेतपत्रिका’ काढणार का ?
आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर कार्यवाही करावी !