
पंढरपूर – आषाढी वारीसाठी निघालेली आदिशक्ती संत मुक्ताई पालखी आज अनुमाने ७०० किलोमीटरचा प्रवास करून मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे पोचली.

पालखीचे आष्टी गावात आगमन होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल क्षीरसागर, सरपंच आणि ग्रामस्थ यांनी पालखीतील वारकरी अन् दिंडीप्रमुख यांचे हार-तुरे देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी प्रशासनाकडून पाणी, आरोग्य, स्वच्छता आणि निवारा यांची व्यवस्था करण्यात आली होती.
प्रशासनाकडून देण्यात येणार्या सर्व सुविधांविषयी आणि उत्कृष्ट नियोजनाविषयी ‘आदिशक्ती संत मुक्ताई संस्थान’चे विश्वस्त श्री. रवींद्र पाटील महाराज यांनी समाधान व्यक्त करून जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. पालखी पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !
पुणे महापालिका समान आणि पुरेसे पाणीपुरवठा योजनेची ‘श्वेतपत्रिका’ काढणार का ?
आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर कार्यवाही करावी !