मुलांचे अश्‍लील साहित्य प्रसारित केल्यावरून ट्विटरविरुद्ध गुन्हा नोंद !

ट्विटरचा प्रतिदिन उघड होणारा गुन्हा पहाता आता त्याच्यावर बंदीच घालणे आवश्यक !

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या १५ सहस्र घटना ! – माजी न्यायाधिशांच्या समितीचा अहवाल

२५ जणांचा मृत्यू, तर ७ सहस्र महिलांशी छेडछाड !

देहलीतील आप सरकारने आवश्यकतेपेक्षा ऑक्सिजनची चौपट मागणी केली ! – सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचा अहवाल

सरकारने याविषयी चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे आणि जर कुणी दोषी आढळले, तर संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे !

एन्.सी.ई.आर्.टी.कडे तिच्या पुस्तकात सतीप्रथेविषयी देण्यात आलेल्या चुकीच्या माहितीचा पुरावा नाही !

केंद्रातील भाजप सरकारने त्याच्या अखत्यारीत असणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.चा हिंदुद्वेष थांबवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

कोरोना अजून गेलेला नसून तो वारंवार रंग पालटत आहे ! – ‘अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थे’च्या प्रमुखांची चेतावणी

डॉ. विग पुढे म्हणाले, ‘‘आपण सतर्क रहायला हवे. लोकांनी स्वच्छ मास्क घालायला हवेत, तसेच लवकरात लवकर स्वतःचे लसीकरण करून घ्यावे आणि कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे.

केंद्र सरकारने बोलावली काश्मीर खोर्‍यातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक !

कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच बैठक !

‘पृथ्वीराज’ चित्रपटाला विरोध करण्यासाठी चंडीगड येथे अभिनेते अक्षय कुमार यांचा पुतळा जाळला !

दुसरीकडे करणी सेनेकडून चित्रपटाचे ‘पृथ्वीराज’ हे नाव पालटून ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’ ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून १५५२६० हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसारित !

केंद्रीय गृहमंत्रालयाने सायबर गुन्ह्याच्या विरोधातील तक्रारींचे निवारण तात्काळ करण्यासाठी आणि डिजिटल व्यवहार सुरक्षित बनवण्यासाठी साहाय्यता (हेल्पलाईन) क्रमांक १५५२६० प्रसारित केला आहे.

लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या ९२ टक्के आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये आढळली कोरोनाची सौम्य लक्षणे ! – ‘फोर्टिस हेल्थकेअर’च्या अहवालातील माहिती

लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या ९२ टक्के आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली, अशी माहिती ‘फोर्टिस हेल्थकेअर’च्या अहवालात देण्यात आली आहे.

निर्बंध शिथिल केल्यावर नियमांचे उल्लंघन होत असल्याने तिसरी लाट भयावह ठरू शकते ! – केंद्रीय गृहमंत्रालयाला भीती

नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई होत नसल्यानेच अन्य नागरिकांवर वचक बसत नाही आणि तेही त्याचे उल्लंघन करतात, त्यामुळे या प्रकारांना पोलीस आणि प्रशासनच अधिक उत्तरदायी आहेत !