कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच बैठक !
पाकप्रेमी राजकीय पक्षांशी चर्चा करून काहीही साध्य होत नाही, हा इतिहास असल्याने अशा बैठका घेणे, म्हणेज बहुमूल्य वेळ वाया घालवण्यासारखे आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
नवी देहली – केंद्र सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रहित केल्यानंतर प्रथमच काश्मीर खोर्यातील प्रमुख राजकीय पक्षांची २४ जून या दिवशी बैठक बोलवली आहे. देहलीत ही बैठक होणार आहे.
Political Parties in #Kashmir welcome PM’s initiative of calling All-Party meet https://t.co/qydAPEDwdi
— Zee News English (@ZeeNewsEnglish) June 19, 2021
जम्मू-काश्मीरची केंद्रशासित प्रदेशांत विभागणी झाल्यापासून तेथे प्रशासनाच्या वतीने कारभार चालू आहे. तेथे सरकार स्थापनेसाठी अद्याप निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे यासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काश्मीरमधील ‘गुपकार गटा’सह पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. १० जून या दिवशी झालेल्या ‘गुपकार गटा’च्या बैठकीनंतर जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे सर्वेसर्वा फारूख अब्दुल्ला यांनी ‘आम्ही अजूनही चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाहीत. जर केंद्राने आम्हाला चर्चेसाठी निमंत्रण दिले, तर आम्ही त्याविषयी विचार करू’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.